Fri, March 24, 2023

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Published on : 24 February 2023, 1:51 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईच्या भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गुरुवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ताडदेव लोकल आर्म युनिट-२ मध्ये कार्यरत पोलिस हवालदार श्याम वरगडे असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची नियुक्ती भायखळा तुरुंगाच्या गेटवर होती. गुरुवारी रात्री ९:२० वाजता त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर पोलिसांनी जखमी वरगडे यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस हवालदार वरघडे हे भायखळा पोलिस ठाणेच्या बाजूस एकटेच वास्तव्यास होते, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या गावी राहतात. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.