Sat, March 25, 2023

एमआयडीसीचा भूखंड अतिक्रमणमुक्त
एमआयडीसीचा भूखंड अतिक्रमणमुक्त
Published on : 26 February 2023, 1:42 am
वाशी, ता. २६ (बातमीदार) : रबाले एमआयडीसी परिसरातील साईबाबानगर येथे एमआयडीसीच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे वसलेल्या झोपड्यांवर एमआयडीसीच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवारी (ता. २४) पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. या वेळी दोन हजार स्क्वे.मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
नवी मुंबईच्या एमआयडीसी क्षेत्रातील मालकीच्या जागेवर झोपड्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा सपाटा सुरू केला आहे. हे अतिक्रमण रोखण्यासाठी एमआयडीसीने आपल्या मालकीच्या जागांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. एमआयडीसीचा रबाळे येथील जागेवर २ हजार स्क्वे. मीटरच्या भूखंडावर झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर कारवाई करत एमआयडीसीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. एक जेसीबी व २५ कामगारांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.