Sat, March 25, 2023

खारोडीतील चेंबरच्या झाकणाला तडा
खारोडीतील चेंबरच्या झाकणाला तडा
Published on : 25 February 2023, 12:41 pm
मालाड, ता. २५ (बातमीदार) ः खारोडी येथील सेंट ज्यूडस शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेले गटार पुन्हा तुटून चेंबरच्या झाकणालाही तडा गेल्याने अपघाताची भीती वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेच्यावतीने या गटाराची दुरुस्ती केली होती. तसेच झाकणही या ठिकाणी बसवण्यात आले होते. मात्र दुरुस्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच गटारावरील सिमेंट उखडण्यास सुरू झाले होते. पालिकेच्या या कामगिरीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. या ठिकाणी सेंट ज्यूडस शाळा, रहिवासी संकुल, बँक आहे त्यामुळे या भागात मोठी वर्दळ असते. अशा वेळी गटारावरील चेंबरच्या तडा गेलेल्या झाकणामुळे दुर्घटनेची भीती वर्तवली जात आहे. तसेच पालिकेने ठोस कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.