
पायोनियर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
वडाळा, ता. २५ (बातमीदार) ः माटुंगा येथील लायन्स पायोनियर हायस्कूल ट्रस्टतर्फे शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. दरम्यान पायोनियर हायस्कूलचे संचालक श्रीराम बापये, सेक्रेटरी नलावडे, शाळेचे माजी उप मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड, भीमराव माळी, माजी शिक्षिका एम. डी.बापट, एस.आय.डब्ल्यू.एस. हायस्कूलचे शिक्षक संजय सकपाळ आदी शिक्षकांचा तसेच शाळेचे माजी विद्यार्थी गांधी हॉस्पिटलचे प्रमुख सर्जन डॉ. गजानन भगत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात तीस वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आले होते. जे आज डॉक्टर, वकील, पोलिस, उद्योजक, लेखक, पत्रकार, कवी अशा विविध क्षेत्रात दिग्गज आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. गजानन भगत, दत्ता जाधव, शिवाजी फणसेकर, गौतम जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.