बनावट वेबसाईटच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या दोघांना कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून 
गंडा घालणाऱ्या दोघांना कोठडी
बनावट वेबसाईटच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या दोघांना कोठडी

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या दोघांना कोठडी

sakal_logo
By

अंधेरी, ता. २५ (बातमीदार) : बनावट ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणाऱ्या एका दुकलीस मालवणी पोलिसांनी अटक केली. किंजर मनूभाई ठक्कर आणि संजय तिरुबाई गोंदलिया यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

गेल्या वर्षी मालाडच्या मालवणी परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराला समाज माध्यमावर एका खासगी कंपनीची एक जाहिरात दिसली होती. कंपनीची वस्तू खरेदी केल्यास त्यावर चांगले कमिशन मिळेल, असे सांगण्यात आले होते. कमिशनच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी एक लाख ३८ हजार रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या; मात्र त्यांना कमिशन मिळाले नाही. तसेच गुंतवणूक केलेली रक्कमही परत देण्यात आली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकाने सुरतच्या वराच्छा येथून किंजर ठक्कर आणि संजय गोंदविला यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सोशल मीडियावर बोगस संकेतस्थळ तयार करून अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली.