Thur, March 23, 2023

दिलीप आकरे यांचे निधन
दिलीप आकरे यांचे निधन
Published on : 25 February 2023, 12:41 pm
कळवा, ता. २५ (बातमीदार) : ठाण्यातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप आकरे पाटील यांचे शनिवारी (ता. २५) ठाण्यातील बेथनी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. दिलीप आकरे पाटील हे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत ठाणे व पालघर जिल्ह्यात शहापूर व वाड्यातील ग्रामीण भागात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी महिलांसाठी आपल्या खर्चात मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केले होते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.