Sun, March 26, 2023

‘कामगारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ’
‘कामगारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ’
Published on : 25 February 2023, 2:33 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : लोअर परेल वर्कशॉपमध्ये सातत्याने अपघात घडत असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत भारतीय कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने लोअर परेल वर्कशॉपचे मुख्य कारखाना प्रबंधक परवेज साहू यांची भेट घेत कामगारांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची विचारणा केली. त्यावर कामगारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ, तसेच सुरक्षेसाठी नवीन धोरण अमलात आणू, असे आश्वासन परवेझ साहू यांनी दिले. या शिष्टमंडळात पश्चिम रेल्वे भारतीय कामगार सभेचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सरचिटणीस रूपेश वायंगणकर, लोअर परेल विभागाचे सेक्रेटरी गणेश मुरुडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.