Thur, March 23, 2023

शंकरवाडीत तरुणाला बॅटने मारहाण
शंकरवाडीत तरुणाला बॅटने मारहाण
Published on : 26 February 2023, 12:00 pm
मालाड, ता. २६ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील शंकरवाडी येथे शनिवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास तरुणाला बॅटने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी नितेश सिंग याची जामिनावर सुटका झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री मनोहर राय हा तरुण एका स्थानिक महिलेशी तिच्या मदतीसाठी भाजप नेत्यांशी भेट घालून देण्याच्या उद्देशाने बोलत होता. त्या वेळी आरोपी नितेश सिंग याने मनोहरशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि मनोहरला नितेशने क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली. त्यानंतर मनोहर राय याने मालवणी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.