मायग्रेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायग्रेन
मायग्रेन

मायग्रेन

sakal_logo
By

मायग्रेनचे दुष्परिणाम
- मायग्रेन आजाराने त्रस्त असणाऱ्यांही ब्रेन स्ट्रोकचा धोका
- अजिनोमोटोच्या अतिवापराने मायग्रेन होतो.
- मायग्रेनमध्ये डोके दोन्ही किंवा कधी कधी एका बाजूने दुखते. त्या वेदना तीव्र असतात. अर्धशिशीचा त्रास जेव्हा होतो तेव्हा रक्तप्रवाह वाढलेला असतो. त्यामुळे वेदनांमध्ये वाढ होते.
- हार्मोन्सच्या पातळीतील चढ-उतार मायग्रेनचे मुख्य कारण आहे.
- मायग्रेनला कारणीभूत ठरणारी कारणे म्हणजे ताणतणाव, थकवा, मद्यपान, तीव्र प्रकाशाचा संपर्क, मोठा आवाज, हवामान, टायरामाइनयुक्त पदार्थांचे सेवन इत्यादी.
...........................
अशी करा मायग्रेनवर मात
ओव्हर-द-काऊंटर (ओटीसी) औषधोपचार : आपले डॉक्टर आपल्याला अशी काही औषधे लिहून देतील ज्यामुळे आपल्याला त्या त्रासदायक वेदनांपासून आराम मिळू शकेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियमही घ्यावे लागेल.

तणावातून मुक्त राहा : ताण व चिंता नियंत्रणात राखणे काळाची गरज आहे. तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि ध्यानासारख्या पर्यायांचा आधार घ्या. प्राणायमही फायदेशीर ठरू शकेल. मनाने औषधोपचार करू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दररोज व्यायाम करा : व्यायामाने निरोगी राहण्यास मदत होईल. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यास संप्रेरकांमुळे होणाऱ्या मायग्रेनपासून मुक्तता मिळते. शिवाय भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे.