Sun, March 26, 2023

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रशीद तडवी यांचे निधन
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रशीद तडवी यांचे निधन
Published on : 26 February 2023, 11:19 am
मुरबाड, ता. २६ (बातमीदार) : मुरबाड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक रशीद तडवी यांचे आजाराने रविवारी (ता. २६) पहाटे निधन झाले. गेली अनेक वर्षे ते मुरबाड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सर्वांची विचारपूस करणारा एक संयमी अधिकारी म्हणून मुरबाड तालुक्यात त्यांचा नावलौकिक होता. जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील विविध संघटना व व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.