ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशन
ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशन

ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशन

sakal_logo
By

ठाणे, ता. २६ (वार्ताहर) ः ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता. २५) पहाटेपर्यंत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. यात विविध गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या ११६ लोकांवर १२९ गुन्हे दाखल करत त्यांना गजाआड करण्यात आले; तर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून ८ लाख ५९ हजार ४०३ रुपयांची दंडात्मक वसुलीही केली.

ठाणे पोलिसांनी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पाच परिमंडळात धडक कारवाई केली. तब्बल २२३ पोलिस अधिकारी आणि १ हजार ५४ पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तडीपार, फरारी आरोपी, जुगाराचे अड्डे, शस्त्रे बाळगणे अशा विविध गुन्ह्यांतील आरोपींवर कारवाई करण्यात आली. तब्बल १२९ गुन्ह्यांची नोंद करीत पोलिस पथकाने ११६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सर्वाधिक कारवाई अवैध धंद्यांवर कारवाई आली; तर सर्वाधिक आरोपी हे दारूबंदीअंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अवैध शस्त्र बाळगणे, तडीपार केल्यानंतरही परिसरात वावरणे, अवैध धंदे, दारूबंदी, जुगाराचे अड्डे, अमली पदार्थाचे सेवन, अजामीनपात्र वॉरंट, गुन्ह्यात फरारी आरोपी यांचा समावेश या कारवाईत प्रामुख्याने आहे.

=====
प्रकार गुन्ह्यांची नोंद अटक आरोपी
====================================
* अवैध शस्त्र बाळगणे ०३ ०३
* तडीपार गुंडांचा वावर ०८ ०८
* अवैध धंदे ६६ ३९
* दारूबंदी ५६ ४७
* जुगार प्रतिबंधात्मक कारवाई ०९ १९
* अमली पदार्थ २९ २९
* अजामीनपात्र वॉरंट व इतर १४ १४
* फरारी आरोपी -- ०४
====================================
एकूण १२९ ११६
===================================
----
१५५३ वाहनांवर कारवाई
पाच परिमंडळात ठाणे पोलिसांनी केलेल्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनअंतर्गत ठाणे वाहतूक शाखेनेही सहभाग घेऊन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यात ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह वगैरे विविध प्रकारात कारवाई केली. यात तब्बल १,५५३ वाहनावर कारवाई करून ८ लाख ५९ हजार ४०३ रुपयांची वसुली करण्यात आली.