निर्माते व लेखक जयंत धर्माधिकारी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्माते व लेखक जयंत धर्माधिकारी यांचे निधन
निर्माते व लेखक जयंत धर्माधिकारी यांचे निधन

निर्माते व लेखक जयंत धर्माधिकारी यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ ः ज्येष्ठ निर्माते व पटकथा लेखक जयंत धर्माधिकारी यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अभिनेत्री सुहिता थत्ते, एक मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.
प्रसिद्ध पटकथा लेखक राम केळकर आणि ग. रा. कामत यांचे ते सहायक होते. निर्माते व दिग्दर्शक राज खोसला यांच्या टीममध्ये त्यांनी लेखक म्हणून काम केले. रफू चक्कर, मै इंतकाम लुंगा, बेनाम, ये तो कमाल हो गया, जवानी दिवानी, दिल दिवाना आदी चित्रपटांचे लेखन त्यांनी केले. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्याचबरोबर काही मालिकांचेही लेखन त्यांनी केले. अनकही या चित्रपटाची निर्मिती अमोल पालेकर आणि त्यांनी एकत्रित मिळून केली. आज सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात नेण्यात येत होते; परंतु वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.