लग्नास नकारामुळे तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नास नकारामुळे तरुणीची आत्महत्या
लग्नास नकारामुळे तरुणीची आत्महत्या

लग्नास नकारामुळे तरुणीची आत्महत्या

sakal_logo
By

खारघर, ता. २७ (बातमीदार) : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका अठरा वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेतील मृत तरुणी खारघरमध्ये आईसह राहत होती. तसेच ती आईसोबत घरकाम करण्यासाठी जात होती. त्याच भागात राहणाऱ्या तरुणाने काही महिन्यांपूर्वी तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. दरम्यान, त्याने तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून तिने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणीच्या बहिणीने खारघर पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.