Sat, April 1, 2023

ठाण्याच्या जेल तलावात मृतदेह
ठाण्याच्या जेल तलावात मृतदेह
Published on : 27 February 2023, 10:16 am
ठाणे, ता. २७ (वार्ताहर) : ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहाजवळ असलेल्या जेल तलावात ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सकाळी आठच्या सुमारास आढळला. मृतदेह तलावामधून बाहेर काढून ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास जेल तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे नगर पोलिस कर्मचारी, शववाहिका, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आदींची उपस्थिती होती. मृतदेह तलावामधून बाहेर काढून ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ठाणे नगर पोलिसांनी तो मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शववाहिकेतून पाठविला.