संत अलॉयसिस शाळेत मराठीचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत अलॉयसिस शाळेत मराठीचा जागर
संत अलॉयसिस शाळेत मराठीचा जागर

संत अलॉयसिस शाळेत मराठीचा जागर

sakal_logo
By

विरार, ता. २७ (बातमीदार) : वसई पापडी येथील संत अलॉयसिस शाळेत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. शाळेतील दिवसाची सुरुवात कुमारी डिलन रिबेलो आणि बेथेल घोन्सालविस यांनी मराठी प्रार्थना गाऊन करण्यात आली. मराठी दिवस साजरा करताना कोणत्याही मोठ्या वक्त्यांना न बोलावता विद्यार्थ्यांनीच विविध मराठी लेखक व लेखिकेच्या भूमिका साकारत भाषा दिनाचे सादरीकरण केले. प्राचार्या सुजाता मर्वी यांच्या मार्गदर्शनाने विविध कार्यक्रम राबवले गेले. मराठी भाषेत नाट्य स्पर्धा, कथाकथन, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेलोसा अवधानी व दर्शन राऊत ह्यांनी केले; तर अंजेलिका फेराव हिने मराठी भाषा अभिमान आणि गौरव व्यक्त करणारी घोषवाक्ये दिली.