Tue, March 28, 2023

जीएससी पॅनलचा २३ जागांवर विजय
जीएससी पॅनलचा २३ जागांवर विजय
Published on : 27 February 2023, 12:33 pm
मुंबई, ता. २७ : गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या निवडणुकीत डॉ. विनय जैन आणि त्यांच्या जीएससी युनायटेड पॅनेलने २४ पैकी २३ जागा जिंकत डॉ. श्याम अग्रवाल पॅनेल आणि जनरल नेक्स्ट पॅनेलचा पराभव केला. डॉ. विनय जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली तीन वर्षे क्लबमध्ये आधुनिक सुविधांसह पंचतारांकित लूक देण्यासाठी पायाभूत सुविधांची सुधारणा केली होती. आम्ही आगामी काळात क्लबच्या सुधारणेसाठी आणि सदस्यांना आधुनिक सुविधांसाठी कठोर परिश्रम करू. सदस्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासारखे उपक्रम राबवणार असल्याचे डॉ. विनय जैन यांनी सांगितले.