Thur, March 30, 2023

चर्नी रोड स्थानकांवर नवीन पादचारी पूल खुला
चर्नी रोड स्थानकांवर नवीन पादचारी पूल खुला
Published on : 27 February 2023, 2:43 am
चर्नी रोड स्थानकातील नवीन पादचारी पूल खुला
मुंबई, ता. २७ : पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावर नवीन पादचारी पूल खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात एकूण १३ पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलांची संख्या १४६ वर पोहोचली आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चर्नी रोड स्थानकात ३८.३ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद असलेला पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. तो फलाट क्रमांक १ आणि ४ ला पूर्वेकडील एमसीजीएम स्कायवॉकशी जोडला गेला आहे. स्थानकातील जुना पादचारी पूल ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये पूल पाडून तो नव्याने बांधण्यात आला.