कळव्यात मराठी गौरव दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात मराठी गौरव दिन साजरा
कळव्यात मराठी गौरव दिन साजरा

कळव्यात मराठी गौरव दिन साजरा

sakal_logo
By

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : श्रीमती कावेरीताई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठमोळ्या पोशाखासह फेटे बांधले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यगीत गायले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मुख्याध्यापिका रंजना स्वामी व उपमुख्याध्यापिका लिना उशिरे यांनी केले. शिक्षक नवनाथ सर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी नववीच्या विद्यार्थ्यांनी अभिमान गीत सादर केले. तसेच गिरीश पाटील याने पोवाडा गायला.