Tue, March 21, 2023

दिव्यात मनसेकडून शिक्षकांचा गौरव
दिव्यात मनसेकडून शिक्षकांचा गौरव
Published on : 28 February 2023, 11:29 am
दिवा, ता. २८ (बातमीदार) : मराठी भाषा दिनानिमित्ताने दिवा येथील ठाणे पालिकेच्या शाळा क्रमांक ७९/९८ मध्ये शिक्षकांचा मनसे दिवा शहर शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. दिवा पश्चिम येथील शाळेतील विद्यार्थ्यांचा ठाणे महापालिका विज्ञान प्रदर्शनात १३५ शाळांमधून तिसरा क्रमांक आला होता. तसेच हेमा फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धत या शाळेने राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. या शाळेला ठाणे महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा या अपुऱ्या असतानाही प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिवस साजरा करण्याचा संकल्प मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केला.
त्यानुसार शाळेतील शिक्षकांचा दिवा मनसेतर्फे सत्कार करण्यात आला.