Fri, March 31, 2023

नाट्यानुभवाने विद्यार्थी मंत्रमुग्ध
नाट्यानुभवाने विद्यार्थी मंत्रमुग्ध
Published on : 28 February 2023, 1:04 am
विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे महाविद्यालयातील निसर्गरम्य साहित्य कट्ट्यावर ‘काव्यानंद आविष्कार शब्दसुरांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात झाली. या वेळी प्रा. लतिका पाटील आणि विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत सादर केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते शार्दुल आपटे यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांबरोबरच गणेश वसईकर यांची ‘बोकड’ तसेच वैभव जोशी यांची ‘थँक्स गॉड कुसुमाग्रज’ ह्या कवितासुद्धा आपल्या खास नाट्यशैलीत सादर केल्या.