कर्मचाऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांना आवाहन
कर्मचाऱ्यांना आवाहन

कर्मचाऱ्यांना आवाहन

sakal_logo
By

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर
बूट पॉलिश कर्मचाऱ्यांना
सतर्क राहण्याचे आवाहन
वडाळा, ता. २८ (बातमीदार) ः होळी आणि धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याच्या वतीने स्थानकातील पोलिस मित्र अर्थात बूट पॉलिश कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात झालेल्या बैठकीत आपले दैनंदिन कर्तव्य करताना काही आक्षेपार्ह आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले.
लोहमार्ग पोलिस आयक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनानुसार सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे प्रभारी निरीक्षक सचिन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २८) बैठक पार पडली. गुप्तचर विभागाकडून वारंवार मिळणाऱ्या माहितीनुसार सध्या अतिरेकी संघटना मोठे सण वा उत्सवकाळात घातपात करण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी रेल्वेस्थानकात काेणी संशयित व्यक्ती, वस्तू अथवा बॅग आढळून आल्यास रेल्वे पाेलिस, आरपीएफ आणि मुंबई शहर पाेलिसांचे हेल्पलाईन क्र. १५१२, १३९ व १०० वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश शिरसाठ, एटीसी अधिकारी पोलिस उप निरीक्षक तमीज मुल्ला, गोपनीय शाखेचे अंमलदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश साळवी आणि २५ पोलिस मित्र बैठककीस उपस्थित होते.