Tue, March 28, 2023

वाड्यात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
वाड्यात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
Published on : 28 February 2023, 2:08 am
वाडा, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील पी. जे. हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी महत्व पटवून देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, शिक्षकांचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बी. के. पाटील, शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.