९० फुटी रस्त्यावर धोकादायक चेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९० फुटी रस्त्यावर धोकादायक चेंबर
९० फुटी रस्त्यावर धोकादायक चेंबर

९० फुटी रस्त्यावर धोकादायक चेंबर

sakal_logo
By

धारावी, ता. १ (बातमीदार) : धारावीतील ९० फुटी रस्ता वर्दळीचा असल्याने रस्त्यावर सतत वाहनांची व पादचाऱ्यांची गर्दी असते. येथील साथी सोसायटीच्या इमारतीसमोरील रस्त्यावर असलेल्या पालिकेच्या मोठ्या चेंबरचे झाकण धोकादायक झाले आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता पालिकेने सदरचे चेंबर दुरुस्त करून घ्यावे, अशी मागणी समाजसेवक अतौल खान यांनी पालिकेकडे केली आहे.