वन जमीनीवरून विधानपरिषदेत लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन जमीनीवरून विधानपरिषदेत लक्षवेधी
वन जमीनीवरून विधानपरिषदेत लक्षवेधी

वन जमीनीवरून विधानपरिषदेत लक्षवेधी

sakal_logo
By

मनोर, ता. १ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या कुडे गावातील वन विभागाच्या मालकीची जमीन भूमिअभिलेख विभागाच्या मदतीने भूमाफियाने हडप केल्याप्रकरणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने विधान परिषदेच्या सचिवांनी कारवाईचा अहवाल मागितल्याने जिल्हा प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे.
पालघर तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत कुडे गावातील राष्ट्रीय महामार्गालगतची सुमारे ४३ गुंठे वनजमीन खाजगी प्रकल्पासाठी बळकाण्यात आली आहे. वन जमीन असलेल्या जागेत ५० मोठ्या आकाराचे स्थानिक वृक्ष, तसेच झाडे-झुडपे असताना जमिनीवर गवत आणि भातशेती केली असल्याचा महसूल विभागाने दिलेला दाखला, गावातील, परंतु महामार्गापासून दूरच्या अंतरावर असलेल्या शेतकऱ्याला हाताशी घेऊन भूखंड क्रमांक १२२ अ/१४ ची खरेदी करून भूमिअभिलेख विभागाच्या मोजणीत महामार्गालगतच्या वन विभागाच्या जमिनीच्या ठिकाणी भूखंड असल्याचे दाखविण्यात आले आहे. या ४३ गुंठे क्षेत्र असलेल्या जमिनीचा नकाशा काढताना वांद्री धरणाच्या उजव्या कालव्याची सलगता राखण्यात आलेली नाही. याप्रकरणी जमीन मालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे करण्यात आली आहे.