स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी जखमी
स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी जखमी

स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी जखमी

sakal_logo
By

नवीन पनवेल ता. १ (वार्ताहर) : तळोजा सेक्टर- २० फेज- २ या ठिकाणी राहणारा एक ९ वर्षीय शाळकरी मुलगा स्कूल व्हॅनमधून पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव अबान राय असे असून शिक्षिका असलेल्या त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून झोया ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्कूल व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबान हा तळोजा फेज -१ मधील कालसेकर इंग्लिश स्कूलमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकतो. अबान हा झोया ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्कूलमधून शाळेतून ये-जा करतो. दरम्यान तो स्कूल व्हॅनमधून खाली उतरत असतांना, त्याच्या बॅगचे हँडल अडकल्याने तो घसरून खाली पडून जखमी झाला. या प्रकरणी अबान याची आई शमीरा राय यांनी दिलेल्या स्कूल व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.