Wed, March 22, 2023

जिजाऊ संघटनेतर्फे कॅण्डल मार्च
जिजाऊ संघटनेतर्फे कॅण्डल मार्च
Published on : 2 March 2023, 11:44 am
विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार (ता. २८) पासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे उपोषणास बसले आहेत. शासनाने याची त्वरित दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी जिजाऊ संघटनेकडून कॅन्डल मार्चचे आयोजन विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रात करण्यात आले होते. या कॅन्डल मार्चमध्ये जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील सर्व नगरसेवक व नगरसेविका सहभागी झाले होते.