Thur, March 23, 2023

डोंबिवलीत ‘गुणांकित सावरकर’ व्याख्यान
डोंबिवलीत ‘गुणांकित सावरकर’ व्याख्यान
Published on : 2 March 2023, 12:10 pm
डोंबिवली, ता. २ (बातमीदार) : शिवाई बालक मंदिर डोंबिवली या शाळेमध्ये कै. ॲड. शशिकांत ठोसर व कै. सीमा ठोसर पुरस्कृत शिवाई बालक मंदिर ट्रस्ट आयोजित विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘गुणांकित सावरकर’ या विषयावर निवेदिका अनघा मोडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शालेय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा सरिता चंदने यांच्या हस्ते अनघा मोडक यांचे स्वागत करण्यात आले. मोडक यांनी सावरकरांचे जन्मस्थान, त्यांचे पूर्ण नाव, त्यांना सावरकर हे नाव कसे मिळाले, त्यांना स्वातंत्र्य सूर्य ही उपमा कशी मिळाली याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. सावरकरांची उडी यासंदर्भात व्याख्यानात त्यांनी त्यामागचे सावरकरांचे तर्कनिष्ठ विचार व भूगोलाचा उत्तम अभ्यास याबाबत विद्यार्थ्यांना गोष्टीरूपामध्ये माहिती सांगितली.