तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

कल्याण, ता. २ (बातमीदार) : पुणे येथे नुकताच झालेल्या पॅरा (दिव्यांग) राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उल्हासनगरातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. खेळाडूंनी तीन पदके पटकावत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरवली आहेत. स्पर्धेत पार्थ चौधरी याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व महाराष्ट्र पॅरा योगासन स्पोर्टस् समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्यस्तरीय पॅरा (दिव्यांग) योगासन ही स्पर्धा राज भवन गणेशखिंड रोड, पुणे पार पडली. दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पल्लवी सेंट, ऑगस्टिन शेंडे, अर्पण भुसारी यांची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना ठाणे जिल्हा योगा प्रशिक्षिका करुणा लेदे यांचे मार्गदर्शन लाभले.