Sat, March 25, 2023

शाहरुखच्या बंगल्यात घुसखोरी करणारे अटकेत
शाहरुखच्या बंगल्यात घुसखोरी करणारे अटकेत
Published on : 3 March 2023, 3:15 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अभिनेता शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात बेकायदेशीर घुसखोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (ता. २) दोन तरुणांना ताब्यात घेतले. वांद्रे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोघेही सुरतचे रहिवासी असून शाहरूख खानचे चाहते असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांनी ‘मन्नत’ बंगल्यावर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घुसखोरी केली. त्यानंतर दोघेही बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलेल्या दोन्ही तरुणांचे वय १९ ते २१ वर्षे आहे.