Sat, March 25, 2023

अंबाडी नाक्यातील विकासकामांसाठी निवेदन
अंबाडी नाक्यातील विकासकामांसाठी निवेदन
Published on : 4 March 2023, 9:49 am
वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील झिडके-अंबाडी नाका हे मध्यवर्ती बाजारपेठ व ठिकाण जनसंपर्काच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून ओळखले जाते. हा विभाग विकासापासून आजपर्यंत उपेक्षित राहिलेला आहे. अंबाडी नाका येथील श्रीज्ञानेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या हर घर जल, हर घर नल या जल जीवन मिशनअंतर्गत झिडके-अंबाडी परिसरातील पंचवीस गावांसाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला होता. या वेळी परिसरातील नागरिकांकडून सर्वांगीण विकासकामे करण्यासाठी पाटील यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.