Tue, March 28, 2023

आरोग्य शिबिराचा ५०० गरजूंना लाभ
आरोग्य शिबिराचा ५०० गरजूंना लाभ
Published on : 4 March 2023, 9:40 am
अंबरनाथ, ता. ४ (बातमीदार) : स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्र आणि स्वराज्य रक्षक स्वाभिमान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा सुमारे ५०० गरजूंना फायदा झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मीकी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख अनिल भोईर यांच्या संकल्पनेतून स्वमै समर्थ मठात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगर येथील सत्यसाई प्लॅटिनम रुग्णालयाच्या सहकार्यातून झालेल्या शिबिरात हृदयविकाराबाबत सामान्य तपासण्या करण्यात आल्या. चंद्रकांत भोईर, अनिल पाटील, योगेश मुरबाडे, अमित पाटील, योगेश हातेकर, प्रदीप भोईर, संदीप सावंत, हेमंत गायकवाड, सागर धुरी आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.