‘टॉक शो’मध्ये अजिंक्य रहाणेच्या संघाचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टॉक शो’मध्ये अजिंक्य रहाणेच्या संघाचे कौतुक
‘टॉक शो’मध्ये अजिंक्य रहाणेच्या संघाचे कौतुक

‘टॉक शो’मध्ये अजिंक्य रहाणेच्या संघाचे कौतुक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर ‘टॉक शो’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी ऑस्ट्रेलियास्थित क्रिकेट समीक्षक, समालोचक गौरव जोशी यांनी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. जवळपास ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी, समीक्षक कायम लक्षात ठेवतील, असेही जोशी यांनी सांगितले. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळी सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या नावांची ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांत दखल घेतली जायची; पण सुरुवातीच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळ करत कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे यापुढे भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अजिंक्य रहाणेच्या त्या भारतीय संघाचा कायम उल्लेख होत राहील, असेही जोशी यांनी सांगितले.