गार्सिया महाविद्यालयाची कृषी विज्ञान केंद्राला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गार्सिया महाविद्यालयाची कृषी विज्ञान केंद्राला भेट
गार्सिया महाविद्यालयाची कृषी विज्ञान केंद्राला भेट

गार्सिया महाविद्यालयाची कृषी विज्ञान केंद्राला भेट

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई येथील संत गोन्सालो गार्सिया कला व वाणिज्य महाविद्यालयातील ग्रामीण विकास पदवी आणि पदव्युत्तर विभागाने डहाणू तालुक्यातील कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दोन दिवसांचे निवासी शिबिर आयोजित केले होते. या भेटीमध्ये त्यांना डॉ. विलास जाधव यांनी कृषी आणि संलग्न व्यवसायातील नावीन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिक प्रगती कशी साधू शकतो, याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. भुवनेश बारी, प्रा. अशोक भोईर, प्रा. डॉ. अरुण माळी उपस्थित होते. याप्रसंगी रेन वॉटर हार्वेस्टिंग, फलोत्पादन, रोपवाटिका, शेडनेट, प्लास्टिक हाऊस, कलमाचे विविध प्रकार या संदर्भात प्रत्यक्ष कृतीद्वारे माहिती देण्यात आली. हे शिबिर प्रा. सूचित म्हात्रे, प्रा. डॉ. अरुण माळी व प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.