
पूर्व उपनगर, शहर विभागात १० टक्के पाणीकपात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ठाणे येथील कोपरी पुलाजवळ मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी १० पासून शनिवार (ता. ११) सकाळी १० या कालावधीत हे काम होणार असल्याने मुंबईतील पूर्व उपनगरासह शहर भागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.
ठाणे महापलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मुंबई पालिकेच्या २,३४५ मिलिमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीचे नुकसान होऊन पाणी गळती सुरू झाली. याच्या दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेतर्फे गुरुवार ते शनिवार या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भागात पाणीकपात
१) पूर्व उपनगरे
टी विभाग ः मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग
एस विभाग ः भांडुप, नाहुर, कांजूरमार्ग, विक्रोळी पूर्व विभाग.
एन विभाग ः विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग
एल विभाग ः कुर्ला (पूर्व) विभाग
एम/पूर्व विभाग ः संपूर्ण विभाग
एम/पश्चिम विभाग ः संपूर्ण विभाग
२) शहर विभाग
ए विभाग ः बीपीटी व नौदल परिसर
बी विभाग ः संपूर्ण विभाग
ई विभाग ः संपूर्ण विभाग
एफ/दक्षिण विभाग ः संपूर्ण विभाग
एफ/उत्तर विभाग ः संपूर्ण विभाग