Wed, March 29, 2023

वसईत बुधवारी ‘खेळ पैठणी’चा स्पर्धा
वसईत बुधवारी ‘खेळ पैठणी’चा स्पर्धा
Published on : 5 March 2023, 9:29 am
विरार, ता. ५ (बातमीदार) : शिवगर्जना अभियानांतर्गत जागतिक महिलादिनी ‘खेळ पैठणी’चा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वसई पश्चिम-अंबाडी रोड येथील साईनगर मैदानावर बुधवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजता ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत शेकडो महिला सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक तथा शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी उपशहर प्रमुख मिलिंद चव्हाण यांनी दिली. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्या महिलेला येवला पैठणी साडीने सन्मानित करण्यात येणार आहे; तर द्वितीय तीन विजेत्या महिलांना पैठणी साडी, तृतीय पाच विजेत्या महिलांना नथ देऊन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट केशरचना व उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा असलेल्या प्रत्येकी दहा महिलांनाही गौरवण्यात येणार आहे.