Sun, April 2, 2023

हॉटेल मालकाला धमकावून पैशाची मागणी
हॉटेल मालकाला धमकावून पैशाची मागणी
Published on : 5 March 2023, 9:43 am
मालाड, ता. ५ (बातमीदार) ः अंधेरी पूर्वेतील साकीनाका येथील हॉटेल मालकाला धमकावून पैशांची मागणी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. भास्कर दुबे हे ब्लू सफायर रेसिडेन्सी हॉटेल भाडे तत्त्वावर चालवत आहेत. त्यांच्याकडून जोगेंद्र गायकवाड आणि त्याचा भाऊ सुभाष गायकवाड हे वारंवार शिवीगाळ करत पैशांची मागणी करत होते. तसेच नकार दिल्यावर हॉटेलमध्ये तोडफोड करत होते. रोजच्या या त्रासाला कंटाळून भास्कर दुबे यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र अद्याप आरोपींवर कारवाई झाली नसल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. दरम्यान, पोलिस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे.