
रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर वॉच
ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : रंगाची उधळण करणारा होलिकात्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. यंदा ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील पाच परिमंडळात तब्बल दोन हजार ६८२ होलिकांचे दहन केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत धुळवड मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. पण रंगाचा हा उत्सव साजरा करताना आनंदाचा बेरंग होऊ नये किंवा कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे. शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत चार हजार ३३ वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय, ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. याचबरोबर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
येत्या सोमवारी ६ मार्च रोजी आलेल्या होळीची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. त्याच्यानंतर ७ मार्चला धुळवड आली असून, १२ मार्चला रंगपंचमी येत आहे. सण किंवा उत्सवाच्या दरम्यान विविध ठिकाणी धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरा करण्याकरीता नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतील. त्यादृष्टीने त्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे, गर्दीच्या ठिकाणी व रहदारीच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. याशिवाय उत्सवा दरम्यान महिलांच्या अंगावर रंग किंवा पाणी फेकणे, महिलांची छेडछाड याचबरोबरीने विनयभंग होण्याची शक्यता लक्षात घेत आणि रंगाचे व पाण्याचे फुगे मारल्याने होणारे अपघात, विहित मर्यादेपेक्षा अति उच्च आवाजात ध्वनीक्षेपकाचा होणारा वापर, गाण्यांच्या तालावर करणारे नृत्य, अंगविक्षेप करून गुलाल, रंग उधळण्याचे प्रकार लक्षात घेता ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी, उच्चभ्रू सोसायटी परिसर तसेच हॉटेल्स, लॉजेस, ढाबे, लॉन्स या परिसरात नागरी गणवेशातील विशेष तपासणी पथके तैनात असणार आहेत.
निर्भया पथकाची गस्त
महिला छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथके गस्त घालणार आहेत. विशेष शाखेकडून नागरी गणवेशातील पोलिसांच्या पथकांद्वारेही गस्त वाढवण्यात आली आहे. खाडीकिनारी जेट्टी लॅन्डीग पॉईंट भागात पोलिसांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाजांवर नजर ठेवण्याकरीता व कारवाईकरीता भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
----------------------------------------------------
गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही
उत्सवाला गालबोट लागू नये, मोठ्या जमावाला नियंत्रित करणे सुलभ जावे, अपप्रवृत्तीची नाकाबंदी करण्यासाठी पाचही परिमंडळात महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही केमेरे बसविण्यात येणार आहेत.
-----------------------------------------
जेट्टी, लँडिंग पॉईंट खाडीकिनारा पोलिसांच्या रडारवर
होळी, धूलिवंदन आदींच्या उत्साहात जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी संशयित हालचाली किंवा संशयित वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केलेले आहे. तर मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यावर तसेच खाडीकिनारच्या जेट्टी आणि लँडिंग पॉईंटदेखील पोलिसांच्या रडारवर राहणार आहे. यासाठी विशेष भरारी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
-----------------------------------------------
पोलिस कारवाईचे संकेत
धुळवडच्या दिवशी ड्राय डे असला तरी अनेक जण मद्यप्राशन करून वाहने चालवतात. अशा तळीरामांना आवर घालण्यासाठी प्रत्येक नाक्यावर मद्यपींची ब्रेथ एन्लायझरद्वारे तपासणी करून कडक कारवाईचे संकेत ठाणे पोलिसांनी दिलेले आहेत. अशा लोकांवर कलाम १४४(१) आणि भादंवि १८८ प्रमाणे कारवाईचे संकेत पोलिसांनी दिलेले आहेत.
------------------------------------
पोलिसांशी संपर्क साधावा
सण, उत्सवादरम्यान महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी काही संशयित हालचाली व संशयित वस्तू दिसून आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी अथवा ठाणे शहर नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
ृ
होलीकांची संख्या
ृ
होळी सार्वजनिक ५६१
खाजगी होळी २,१२१
ृएकूण २,६८२
ृ--------------------------------------------------
पोलीस बंदोबस्त
ृ
ङ अप्पर पोलीस आयुक्त ०३
ङ पोलीस उप आयुक्त ०७
ङ सहाय्यक पोलीस आयुक्त ११
ङ पोलीस अधिकारी ४००
ङ पोलीस कर्मचारी(महिलांसह) ३,०००
ृ ३,४२१
वाहतूक पोलीस बंदोबस्त
ृ
ङ पोलीस अधिकारी ४२
ङ पोलीस अंमलदार कर्मचारी ५००
ङ सध्या गणवेशातील पोलीस ७०
ृ ६१२
ृ
एकूण बंदोबस्त पोलीस संख्या ४,०३३
ृ