महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व

sakal_logo
By

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ वाचकांच्या मनावर राज्य केले. उत्तम वक्ता, नाटककार, अभिनेता, वादक आणि गायक अशी चौफेर कामगिरी केलेल्या पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवले. ‘भाई’ या टोपणनावानेही ते महाराष्ट्राला परिचित होते.
पुलंचा जन्म मुंबईतील गावदेवी येथे झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरीमधील सारस्वत कॉलनीमध्ये गेले. त्यांनी पार्ले-टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांच्यावर साहित्यप्रेमाचे आणि विनोदबुद्धीचे संस्कार झाले. वंदे मातरम्‌, दूधभात आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. ‘बटाट्याची चाळ’, ‘ती फुलराणी’, ‘सुंदर मी होणार’, ‘असा मी असा मी’, ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाट्याविष्कारांसोबतच त्यांची अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा ही प्रवासवर्णने; एक शून्य मी, अघळपघळ, आपुलकी, उरलंसुरलं, नसती उठाठेव, हसवणूक ही पुस्तके लोकप्रिय आहेत. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पुढे १९६६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या सन्मानार्थ २००२ मध्ये मुंबईत पु. ल. देशपांडे कला अकादमीची स्थापना करण्यात आली.
- अनिल साबळे