वयोवृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून दागिने लुटणाऱ्या दोघांना बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वयोवृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून 
दागिने लुटणाऱ्या दोघांना बेड्या
वयोवृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून दागिने लुटणाऱ्या दोघांना बेड्या

वयोवृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून दागिने लुटणाऱ्या दोघांना बेड्या

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : पार्सल देण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेच्या घरात शिरून तिच्या तोंडात बोळा कोंबून दीड लाखांचे दागिने दोघांनी लुटले होते. मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने काही तासांतच त्यांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर ३ मधील राधाबाई कृष्णानी चौकाजवळील रामायण नगरातील एका इमारतीत माया हिरानंद लालवानी (वय ६५) शनिवारी (ता. ४) संध्याकाळी एकट्या होत्या. दोन अनोळखी व्यक्तींनी पार्सल देण्याचा बहाणा करून त्यांच्या घराची बेल वाजवली. माया यांनी दरवाजा उघडताच दोघांनी जबरदस्तीने घरात शिरकाव करून आणि त्यांना मारहाण करून तोंडात बोळा कोंबला. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले असे दीड लाखांचे दागिने लुटून पळ काढला. या प्रकाराची तक्रार त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात केली. सीसीटीव्ही व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे मुकेश गोवर्धनदास खूबचंदानी, आनंद कुश मोंडल यांना रविवारी (ता. ५) पहाटे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.