विज्ञान दिनानिमित्त पालिकेच्या शाळांतील मुलांनी सादर केले नवनवीन प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान दिनानिमित्त पालिकेच्या शाळांतील मुलांनी सादर केले नवनवीन प्रयोग
विज्ञान दिनानिमित्त पालिकेच्या शाळांतील मुलांनी सादर केले नवनवीन प्रयोग

विज्ञान दिनानिमित्त पालिकेच्या शाळांतील मुलांनी सादर केले नवनवीन प्रयोग

sakal_logo
By

बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : जागतिक विज्ञान दिनानिमित्त कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या ज्युवेली शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा आधार घेत जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी आविष्कार केलेले शोध स्वतःच्या कल्पकतेने सादर करण्यात आले होते. एकीकडे मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जात असताना दुसरीकडे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या शाळा मात्र कात टाकत असून, या शाळांमधील पटसंख्या ही दरवर्षी वाढत आहे. पालिकेच्या ज्युवेली येथील शाळेत एकूण ४५० इतकी पटसंख्या असून पहिली ते सातवीचे वर्ग या शाळेत भरतात. या शाळेमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टिंग, पवनचक्की प्रकल्प, प्रदूषण रोखण्यासाठी करता येतील, असे उपाय, शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धत, हवा जागा व्यापते, रस्ते अपघात टाळण्यासाठी जागतिक स्तरावर घेण्यात येत असलेल्या उपाय योजना, या प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या पालकांना व नागरिकांना माहिती दिली. त्यांचे कौशल्य पाहून उपस्‍थित मान्यवर, पालक व नागरिकांनी या मुलांचे व शिक्षकवर्गाचे कौतुक केले. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमाला शहरातील अनेक नागरिकांनी भेट देऊन मुलांच्या कल्पक बुद्धीचे कौतुक केले. या वेळी मुख्याध्यापिका शोभा पाटील यांच्यासह इतर शिक्षकवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.