माळशेज घाट परिसरात गारांसह पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळशेज घाट परिसरात गारांसह पावसाची हजेरी
माळशेज घाट परिसरात गारांसह पावसाची हजेरी

माळशेज घाट परिसरात गारांसह पावसाची हजेरी

sakal_logo
By

मुरबाड, ता. ७ (बातमीदार) : सोमवारी (ता. ६) सायंकाळी माळशेज घाट परिसरात गारासह जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अचानक आलेला पाऊस आणि महामार्गाचे चालू असलेले काम यामुळे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठिकठिकाणी थांबावे लागले. माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या अनेक गावांमध्येसुद्धा पाऊस पडल्याने होळीच्या सणात लोकांच्या आनंदावर विरजण पडले; तर भाजीपाला, पिकांचे मोठे नुकसान झाले. वीटभट्टीवर तयार केलेल्या कच्च्या विटा भिजून मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर व छोटी फळेसुद्धा गळून गेली आहेत.