Thur, March 23, 2023

मिरची पिक धोक्यात
मिरची पिक धोक्यात
Published on : 7 March 2023, 11:47 am
कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात गेल्या दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐनवेळी होळी-शिमग्याच्या उत्सवावर पाणी फेरले आहे. मिरची बागायतदार, आंबा व इतर भाजीपाला बागायतदार शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी अती थंडी, वादळ-वारा यापासून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातच आता हा अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. या वर्षी मिरची लागवडदार सुरुवातीपासून नुकसानीला सामोरे जात होते. आता अवकाळी पाऊस पडल्यामुळे मिरचीच्या रोपांना कीड लागण्याची भीती व्यक्त होत आहे.