ठाण्यात रंगला राजकीय शिमगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात रंगला राजकीय शिमगा
ठाण्यात रंगला राजकीय शिमगा

ठाण्यात रंगला राजकीय शिमगा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे शहरात होलिका दहन आणि धुळवडीला राजकीय शिमगाही रंगल्याचे दिसले. याची सुरुवात होलिकादहन होण्याच्या काही तासांपूर्वी ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यापासून झाली; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

ठाण्यातील शिवाईनगरमधील जुनी शाखा ताब्यात घेण्यासाठी टाळे तोडण्याचा प्रकार शिंदे गटाने केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. गेल्या ३५ वर्षांपासून शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा कार्यरत आहे; मात्र या वादामुळे परिसरात एकच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करून परिस्थिती हाताळली. तसेच कायदा आणि सुव्यस्था बिघडू नये, यासाठी या भागात जमावबंदीचे आदेश लागू केले होते.

ठाकरे गटाकडूनच आडकाठी
स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या ताब्यात शिवाईनगर येथील शाखा आहे. अनेक वर्षे येथून ते काम करतात. आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले.

‘खोके कंपनीच्या बैलांना होय’ नावाने बोंब
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाच्या नावे बोंब ठोकत होळी दहन केली. खोके कंपनीच्या बैलांना होय, अशी बोंब मारत होळीचे दहन करण्यात आले. होळीसाठी जमलेल्या महिलांनीही सिलिंडर महागाईवरून प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणाही दिल्या.