महिला दिनानिमित्त विधानसभेत लक्षवेधी अष्टभूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनानिमित्त
विधानसभेत लक्षवेधी अष्टभूजा
महिला दिनानिमित्त विधानसभेत लक्षवेधी अष्टभूजा

महिला दिनानिमित्त विधानसभेत लक्षवेधी अष्टभूजा

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ७ ः जागतिक महिला दिनानिमित्त उद्या (ता. ८) विधानसभेचे कामकाज महिलाकेंद्रित करण्यास विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच महिला सबलीकरणाच्या ठरावातील चर्चेत सर्व पुरुष सदस्यांनी संवेदनशील, अभ्यासपूर्ण मते मांडावीत, अशी अनौपचारिक सूचना अध्यक्षांनी केल्याची जोरदार चर्चा सुरू होती; मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या विधानसभेतील कामकाजात महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न लक्षवेधी सूचनेमार्फत सभागृहात मांडले जातात. उद्या विविध पक्षांतील आठ महिला लक्षवेधी सूचना मांडणार आहेत. अध्यक्षांच्या कार्यालयाने ‘महिला दिनाला महिलांना प्राधान्याने संधी’ अशी सूचना विधिमंडळ सचिवालयाला केली. महिला आमदारांनी मांडलेल्या प्रश्नांची आणि लक्षवेधी सूचनांची यादी तयार करून त्यांना उद्या प्राधान्य देण्यात आल्याचे समजते. अध्यक्ष राहुल नार्वेकर विधिमंडळातील सर्व महिला आमदार आणि कर्मचाऱ्यांना उद्या महिला दिनी भेटणार असल्याचेही समजते.
---
स्तनकर्करोग जनजागृती
दरम्यान, महिला दिनानिमित्त पर्यटन विभागातर्फे महाराष्ट्रातील नामवंत महिलांचा उद्या सायंकाळी गेट वे ऑफ इंडियावर सत्कार होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे महिलांच्या कर्करोगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.