स्त्रीशक्तीचा आदर करू या ः मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्रीशक्तीचा आदर करू या ः मुख्यमंत्री
स्त्रीशक्तीचा आदर करू या ः मुख्यमंत्री

स्त्रीशक्तीचा आदर करू या ः मुख्यमंत्री

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुलींनीही आपल्यातील या शक्तीला ओळखून संधींची नवी क्षितिजे ओलांडण्याची हिंमत बाळगावी. त्यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या दिनाच्या पूर्वसंध्येला दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी संदेशात म्हटले आहे की, आपल्या संस्कृतीने स्त्रीला मोठा सन्मान दिला आहे. मातृशक्ती म्हणून स्त्रियांनीच या राष्ट्राचे भवितव्य घडवले आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक माता-भगिनींनी विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. सरकार महिला विकासाच्या अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प राबवत आहे. अर्थव्यवस्थेत महिला शक्तीचा समसमान वाटा असणार आहे.