पालिकेच्‍या ठक्कर बाप्पा चौकीत महिलांचा सत्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्‍या ठक्कर बाप्पा चौकीत महिलांचा सत्‍कार
पालिकेच्‍या ठक्कर बाप्पा चौकीत महिलांचा सत्‍कार

पालिकेच्‍या ठक्कर बाप्पा चौकीत महिलांचा सत्‍कार

sakal_logo
By

चेंबूर, ता. ८ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालिका एम पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत ठक्कर बाप्पा चौकीत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहराची साफसफाई करणाऱ्या कर्मचारी वर्गात महिलांचीही संख्या अधिक आहे. या महिलांना मान-सन्मान मिळण्यासाठी महिला दिनानिमित्त त्‍यांचा सत्कार करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व थोर समाजसेवक यांच्‍या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी महिलादिनाचे महत्त्‍व कामगार वर्गाला सांगितले.
या वेळी कनिष्ठ आवेक्षक अधिकारी दत्तात्रय मोहिते, गोकुळ शिंदे, किशोर परमार, कामगार नेते संदीप मोते यांच्या हस्ते महिलांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी पालिका कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.