
कुष्ठरोग, क्षयरोग शोध मोहीमेसाठी मॅरेथॉन स्पर्धा
डहाणू, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग अभियानाबरोबरच सक्रिय क्षयरोग शोध मोहीम सप्ताह राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी मार्फत चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेच्या एम. के. ज्युनिअर कॉलेज येथे जनजागृतीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ होते. या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधीक्षक तथा सहाय्यक संचालक कुष्ठरोग पालघरचे डॉ. संदीप गाडेकर, मुख्याध्यापक महेशकुमार रावते, उपप्राचार्य संगीता चुरी, पंचायत समिती सदस्य सुनील धोडी, जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक अमित जाधव, चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना खंडेझोड, डॉ. सुप्रिया चुरी, डॉ. प्रभाकर कांबळे, उमेश साळुंखे आदी उपस्थित होते. या वेळी ५० मुलामुलींची चिंचणी समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर दोन किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पहिल्या आलेल्या तीन मुलामुलींना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम देण्यात आली.