Tue, March 28, 2023

मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून ४२५.३९ कोटींची कमाई!
मध्य रेल्वेची भंगार विक्रीतून ४२५.३९ कोटींची कमाई!
Published on : 8 March 2023, 2:05 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मध्य रेल्वेने ‘शून्य भंगार मोहिमे’अंतर्गत चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भंगार विक्रीतून ४२५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा भंगार महसूल फेब्रुवारी २०२३ पर्यंतचा असून, रेल्वे बोर्डाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वेस्थानके, विभाग भंगारमुक्त करण्यासाठी ‘शून्य भंगार मोहीम’ राबवली आहे. त्यानुसार २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) या वर्षात भंगार विक्रीतून ४२५.३९ कोटींचा महसूल मिळवला. हा महसूल फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या ३८८.८० कोटींच्या आनुपातिक विक्री उद्दिष्टापेक्षा ९.४ टक्के जास्त आहे.