कोसबाड-बोर्डी उड्डाणपूल मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोसबाड-बोर्डी उड्डाणपूल मंजूर
कोसबाड-बोर्डी उड्डाणपूल मंजूर

कोसबाड-बोर्डी उड्डाणपूल मंजूर

sakal_logo
By

कासा, ता. ९ (बातमीदार) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या पाठपुराव्याने उड्डाणपूल मंजूर झाले असून पुलाच्या कामाचे उद्‍घाटन करण्यात आले. उद्‍घाटनप्रसंगी आमदार कॉ. निकोले म्हणाले, की कैनाड, सरवली, वाकी येथून जाणाऱ्या रेल्वे फ्रेट कॉरिडोरदरम्यान कैनाड रस्त्यावर कोसबाड-बोर्डीदरम्यान उड्डाणपूल हा या कामाच्या आराखड्यात नव्हता. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच येथील नागरिकांनी किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना यांच्याशी संपर्क साधून उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्यानंतर आमदार निकोले यांनी भारतीय रेल्वेकडे मागणी केली असता त्यावर कार्यवाही होऊन उड्डाणपूल मंजूर झाले. याप्रसंगी माकप आमदार विनोद निकोले, किसान सभा कार्यध्याक्ष कॉ. चंद्रकांत घोरखना, कैनाड ग्रामपंचायत सरपंच कॉ. नूतन चिपात, सरावली ग्रामपंचायत सरपंच देवराम दळवी, सदस्य केशव दळवी, कॉ. राजेश दळवी, कॉ. आदित्य अहिरे, कॉ. कमलेश राबड, कॉ. शैलेश कुवरा तसेच रेल्वेचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.