पुस्तक विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य्य करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य्य करण्याची मागणी
पुस्तक विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य्य करण्याची मागणी

पुस्तक विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य्य करण्याची मागणी

sakal_logo
By

चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः कोरोनाच्या काळात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राज्यातील पुस्तक विक्रेत्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक साह्य करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक-ग्रंथ महोत्सव समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली आहे. लोकांपर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून भारताचा इतिहास पोहचवण्याचे काम देशातील पुस्तक विक्रेते व स्टॉलधारक महाराष्ट्रभर करत आहेत; परंतु कोरोना काळात पुस्तक विक्रेत्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अशा वेळी राज्यातील विविध घटकांना आर्थिक साह्य करणाऱ्या राज्य सरकारने या पुस्तक विक्रेत्यांनादेखील माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करावी, अशी मागणी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक-ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केली आहे.